Lockdown : ‘नायक’मध्ये अनिल कपूरचा बॉडीडबल बनलेला आरिफ खान ‘लॉकडाऊन’मुळं अडचणीत !

पोलिसनामा ऑनलाइन –एक कलाकार आहे जो अभिनेता अनिल कपूरचा डुप्लिकेट म्हणून ओळखला जातो. याचं नाव आहे आरिफ खान. आरिफ अनिल कपूरच्या अनेक सिनेमात त्याचा बॉडी डबल बनला आहे. परंतु आज कोरोनाच्या संकटामुळं आरिफ अडचणीत आला आहे. त्यानं आता FWICE कडून मदतीची आशा केली आहे.

अनिलक कपूरच्या डुप्लीकेटची हालत खराब

आरिफ खान सध्या आपल्या उदरनिर्वाहासाठी अडचणीत आला आहे. कोरोनामुळं सध्या कोणता इव्हेंट नाही. त्यामुळं त्याच्याकडे पैशांचं कोणतंही साधन नाही. एका मुलाखतीत बोलताना आरिफ म्हणाला, “माझ्याकडे आता फक्त 3200 रुपये राहिले आहेत. माझी स्थिती एवढी वाईट कधीच झाली नव्हती. मी ठिकठाक कमाई करत असतो. अजून खूप महिने बाकी आहेत आणि मी जास्त पैसे वाचवू शकलेलो नाही. मला माझ्याव्यतिरीक्त माझ्या दोन भावांच्या कुटुंबाकडेही पहावं लागतं. त्यामुळं काम ठप्प असेल तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो.” असंही त्यानं सांगितलं.

आरिफला अशी आशा आहे की, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) त्याला नक्कीच मदत करेल. आरिफ म्हणतो, “FWICEचे प्रेसडिंट रोजानं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप चांगलं काम करत आहे. मी त्यांच्या कामाचं कौतुक करतो. मला आशा आहे की अशा कठिण काळात ते मला मदत करतील.”