Coronavirus : मुंबईत ‘लॉकडाऊन’ अधिक ‘कडक’, अनेक भागात SRPF च्या तुकड्या ‘तैनात’

ठाणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घरात राहण्याचे बंधनकारक आहे. तसेच लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहणार आहेत. सरकारने आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आणि गर्दी न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र, नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांकडू गर्दी करण्यात येत आहे.

देशात लॉकडाऊन असताना ठाण्यातील नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी ठाणे आयुक्तालयातून यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ठाण्यातील तीन ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF चे जवान तैनात करण्यात आले आहेत. ठाणे चेक पोस्ट, कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ठाणे चेक पोस्टवर 1 तुकडी, मुंब्रा येथे 4 तुकड्या आणि कळवा येथे 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच शहरात राज्य राखीव दल तैनात करण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ने लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकांश रुग्ण येणाऱ्या विविध पॉकेट्स तयार करण्यात आले असून या भागामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्याची योजना लवकरच लागू करण्यात येणार आहे. ठाणे आयुक्तालयाकडून अशाच पॉकेट्समध्ये एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 215 पर्यंत पोहोचला असून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत ही संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा गुणाकार होऊ नये यासाठी अधिक कडक कारवाई करण्यासाठी अधिक बाधितांची संख्या असलेल्या भागात कडक संचारबंदी लावण्यात येणार आहे.