घाईनं Lockdown लावावा अशी परिस्थिती नाही पण..; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले असून दररोज 2 लाखापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. अनेक राज्यात लॉकडाऊन ( Lockdown ) लावण्यात आला आहे. सध्या देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. असे असताना लॉकडाऊन संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठ विधान केले आहे. देशात घाईगडबडीने लॉकडाऊन (Lockdown ) लावावा अशी सध्यातरी परिस्थिती दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसलाला दिलेल्या मुलाखती शहा म्हणाले की, गेल्यावर्षी लॉकडाऊन संदर्भातला उद्देश हा वेगळा होता. आम्हाला पायाभूत सुविधा आणि उपचाराशी रुपरेषा तयार करायची होती. तेंव्हा आमच्याकडे कोणतेही औषध, लस नव्हती. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. तरीही आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत. सर्व परिस्थितीचा आणि सगळ्यांची मते विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे शाह यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी बरेच उपक्रम सुरू होते. आणीबाणीच्या गोष्टी आता का नाहीत असा सवालही शाह यांना केला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, हे खरे नाही. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दोन बैठका झाल्या. नुकतीच सर्व राज्याच्या राज्यपालांसोबतही बैठक झाली. सर्व सरकारांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील भागधारकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आमची बैठक झाली. लसीकरणाबाबत आमची वैज्ञानिकांशी चर्चा झाली. कोरोनासोबत लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. यावेळी कोरोनाच्या प्रसाराची गती इतकी अधिक आहे की ही लढाई थोडी कठीण आहे.

ADV

परंतु यावर आपण नक्की विजय मिळवू असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या रॅली आणि कोरोनाची नवी लाट याबाबतही शाह यांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावेर ते म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुका आहेक का? त्या ठिकाणी 60 हजार रुग्णांची नोंद होत आहे. तर येथे 4 हजार आहे.
महाराष्ट्रासाठीही मला सहानुभूती आहे अन् पश्चिम बंगालसाठीही. याला निवडणुकांसोबत जोडणे योग्य नाही.
ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण