मोदी साहेब तेवढ जशोदाबेनच काय झाल ते सांगा : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या प्रत्येक सभेत राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उस्मानाबादत्या सभेत चांगलाच समाचार घेतला.

शरद पवारांच्या कुटुंबात पक्षाच्या श्रेया वरून वाद सुरू असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मोदीच्या टीकेला उत्तर देताना मुंडेंनी मोदींची खिल्ली उडवली आहे. उस्मानाबाद येथील महाआघाडीचे उमदेवार राणाजगजित सिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बोलत होते.

देशाचे प्रमुख आणि पंतप्रधान यांनी एखाद्या नेत्याच्या घरापर्यंत जाऊन टीका करावी, एवढी वाईट वेळ देशाच्या पंतप्रधानावर येणे याचाच अर्थ मोदींना समोर पराभव दिसत आहे. मोदी साहेब तुम्ही आमच्या नेतृत्वाच्या घरापर्यंत आलात. पवार साहेबांच्या घराचे जाऊ द्या हो मोदी साहेब, तेवढ जशोदाबेनच काय झाले सांगाना. अश्याप्रकारे, धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.