‘या’ राज्याने ३० वर्षांपासून निवडून दिला नाही मुस्लिम खासदार

अहमदाबाद : वृत्तसंस्था – मागील ३० वर्षापासून गुजरातमधून एकही मुस्लीम खासदार निवडून आलेला नाही. जवळपास १० टक्के मुस्लिम लोकसंख्या असेल्या गुजरातमध्ये यांदाही याची पुनरावृत्ती होणार का, याचे उत्तर २३ मे रोजी मिळेल. काँग्रेसचे माजी अध्यक्षा सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल हे १९८४ मध्ये विजयी झाले होते. मात्र १९८९ मध्ये भाजपाच्या चंदू देशमुख यांनी पटेल यांचा परभाव केला होता. तेव्हापासून गुजरातमधून मुस्लीम खासदार निवडून आलेला नाही.

गुजरातमध्ये सध्या ९.५ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. मागील वर्षांचा इतिहास पाहीला असता १९६२ मध्ये बनासकांठामधून जोहरा चावडा निवडून आल्या होत्या. त्यानंतर १९७१ मध्ये दोन मुस्लिम उमेदवार निवडून आले होते. अहमद पटेल (भरुच) आणि एहसान जाफरी (अहमदाबाद) या दोन उमेदवारांवर जनतेने विश्वास दाखवला होता. एकाच निवडणुकीत दोन मुस्लिम खासदार निवडून येण्याची ही गुजरातमधील पहिली आणि शेवटची वेळ होती.

गुजरात भाजपासाठी हिदुत्वाची प्रयोगशाळा आहे. या राज्यात भाजपाने कधीही मुस्लिम उमेदवार दिला नाही. काँग्रेसने २०१४ पर्यंत राज्यात १५ मुस्लिम उमेदवार दिले आहेत. यावेळी काँग्रेसने भरुचमधूनच मुस्लिम उमेदवार दिला आहे. या मतदारसंघामध्ये मुस्लिमांचे प्राबल्य आहे. भरुच मतदारसंघात १५ लाख ६४ हजार मतदार आहेत. यातील २२ टक्के मतदार मुस्लिम आहेत. गांधीनगरमधील जुहापुरामध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. यंदा या मतदार संघातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like