Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 25 फेब्रुवारीनंतर?

अंदाजपत्रकातील कामांच्या वर्कऑर्डर 25 फेब्रुवारीपर्यंत देण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये कामे अडकू नयेत, यासाठी महापालिका Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान अंदाजपत्रकातील कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर देण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत.

आयुक्तांच्या या आदेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता २५ फेब्रुवारीनंतर लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने अंतिम मतदार याद्या आज जाहीर केल्या आहेत. तर महापालिका आयुक्तांनी देखिल महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद असलेल्या कामांच्या निविदा व वर्कऑर्डर २० ते २५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीमध्ये वर्क ऑर्डर न दिल्यास आर्थीक तरतूद लॅप्स होईल, असा सूचनावजा इशारा पालिकेच्या सर्वच विभागाना दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सर्व काम २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत असून २५ फेब्रुवारीनंतर केव्हांही निवडणुकीची घोषणा होउ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Rohit Pawar | उद्या ED कार्यालयात माझ्यासोबत शरद पवार, सुप्रिया सुळे येणार, रोहित पवारांची माहिती, कार्यकर्त्यांना म्हणाले…

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत काँग्रेस प्रभारींनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका, ”यांच्याशी युती केल्याचा आज मलाही पश्चाताप होतोय…”

पिंपरी : ‘तु माझ्या घरच्यांचे फोन का उचलते?’ पत्नीला लाटण्याने मारहाण, पती विरोधात FIR

पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद, सासरच्या लोकांकडून जावयाला दगडाने मारहाण; कोंढवा परिसरातील प्रकार