तेजप्रताप यांच्या गाडीवर हल्ला, सुरक्षा रक्षकाकडून कॅमेरामनला मारहाण

पाटणा : वृत्तसंस्था – देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा आज अंतिम टप्पा पार पडत आहे. अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २३ मे रोजी निकाल लागणार आहे. आज सुरू असलेल्या मतदानाला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजपाल यादव हे मतदान करून परतत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

यामध्ये त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. तेजपाल यादव हे मतदान करून परतत असताना एका कॅमेरामनने फुटेज मिळवत असताना गाडीचे विंडशिल्ड तोडले. यामुळे तेजपाल यादव यांच्या अंगरक्षकाने कॅमेरामनला मारहाण केली. दरम्यान तेजपाल यादव यांनी कॅमेरामननेच माझ्या गाडीचं नुकसान केले असल्याचे सांगत अंगरक्षकांकडून कॅमेरामनला मारहाण केली नसल्याचे म्हटले आहे.

आपल्याला मारण्यासाठी हा कट असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. लोसभेच्या अंतीम टप्पयात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५९ जागांसाठी हे मतदान होत आहे. ९१८ उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे १० कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत.