मुंबई उत्तर पश्चिम : एकतर्फी लढतीत गजानन कीर्तीकर विजयी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. या लढतीमध्ये गजानन कीर्तीकर यांनी संजय निरुपम यांचा २ लाख ५१ हजार १९९ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. काँग्रेसचे संजय निरूपम यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

भाजपाचे वरिष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव करुन जायंट किलर ठरलेले निरुपम कीर्तिकर यांना कडवी टक्कर देतील असा अंदाज होता. मात्र कीर्तिकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि त्यानंतर ती वाढवत नेली. त्यामुळे ही लढत कमालीची एकतर्फी झाली.

२०१४ च्या निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे १ लाख ८० हजार मतांनी पराभव केला होता. यंदा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून गजानन किर्तीकर यांना आव्हान दिलं होतं. यंदा या मतदारसंघामध्ये ५०. ५७ टक्के मतदान झाले.

उमेदवार                          पक्ष                   मिळालेली मतं
गजानन किर्तीकर          शिवसेना                    ५५३१७८
संजय निरुपम                काँग्रेस                      ३०१९७९
सुरेश शेट्टी          वंचित बहुजन आघाडी             २२९७१

मुंबई उत्तर पश्चिममधील एकूण मतदान – १७ लाख ३२ हजार ०८५
मुंबई उत्तर पश्चिममध्ये झालेले मतदान – ९ लाख ३९ हजार ८२५