#Loksabha : उस्मानाबादची जागा काँग्रेसकडे ? 

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप व शिवसेनेने मागून येऊन युुती केली. या दोन्ही पक्षांचे एकत्रित मेळावेही सुरु झाले असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजून कोणी कोणती जागा लढवायची याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली उस्मानाबादची जागा काँग्रेस मागण्याच्या तयारीत असून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वतुर्ळात व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील किंवा त्यांच्या पत्नी जि प उपाध्यक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या नावाचा आग्रह स्थानिक काँग्रेसने धरला आहे. परंतु उस्मानाबादच्या  मोबदल्यात कोणती जागा द्यायची हा तिढा सोडविणे आवश्यक आहे. उस्मानाबादच्या बदल्यात औरंगाबाद राष्ट्रवादीला सोडण्याचा विचार होऊ शकतो. परंतु, सध्या तरी काँग्रेस औरंगाबाद सोडण्याच्या तयारीत नाही.