मोदींवरून अनुपम खेर आणि स्वरा भास्कर यांच्यात जुंपली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –आगामी लोसकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात आता अनेकजण असे आहेत जे मोदींना पाठिंबा देत आहेत तर काही विरोध करत आहेत. बॉलिवूडमध्येही असेच काहीसे आहेत. काही कलाकार मोदींनी पाठिंबा देत आहेत तर काही विरोध करत आहेत. यावरून बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. अनेक कलाकारांनी एकत्र येत भाजपा सरकारला मतदान न करण्यासाठी आवाहन केलं आहे. यावरून अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर आमने सामने आले आहेत.

दरम्यान, बॉलिवूडमधील तब्बल 600 कलाकार मोदी सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. त्यांनी मोदींना मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. अशात अनुपम खेर यांनी मोदी सरकारला उघड पाठिंबा दिला आहे. मोदींना विरोध करणाऱ्या सर्व कलाकारांविरोधात अनुपम खेर उभे राहिले आहेत. मोदींना विरोध करणारे सर्वजण विरोधीपक्षासाठी काम करत आहेत असा आरोप अनुपम खेर यांनी केला आहे.

मोदींना विरोध करणाऱ्या कलाकारांवर भाष्य करताना अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, “माझ्या बिरादरीतील काही लोक सध्या संविधानिक प्रक्रियेतून निवडून दिलेल्या सरकारला मतदान न करण्याचं आवाहन जनतेला करत आहेत. दुसऱ्या बाजूला ते सर्वजण विरोधी पक्षाचा प्रचार करत आहेत. किमान इथे कोणताही देखावा नाही.” असे अनुपण खेर म्हणाले.

अनुपम खेर यांच्या ट्विटला अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी उत्तर दिलं आहे. स्वराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सर याला लोकशाही म्हणतात… भारत माता की जय !”

याशिवाय अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनीही अनुपम खेर यांच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जर तुम्ही स्वत:सोबत सध्याच्या सराकारला जोडू शकता, तर तुम्हाला काय वाटतं इतर काही लोक वेगळं करत आहेत ?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.

काह दिवसांपूर्वीच नसरुद्दीन शाह आणि अमोल पालेकरसहा बॉलिवूडमधील तब्बल 600 कलाकरांनी एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारला मतदान न करणयाचं आवाहन केलं होतं. याबाबतीत त्यांनी Artist Unite India या वेबसाईटवर एक पोस्टही टाकली होती. त्यानंतर आता मोदींना पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट तयार झाले आहेत. यानंतरआता कलाकरांमध्ये ट्विट वॉर सुरु झाल्याचे दिसत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us