‘दुवाओ में याद रखना’ ; सुषमा स्वराज यांचा मोदींकरिता ट्विटरवर खास संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्रिमंडळाची रचना करताना फिटनेस आणि कामगिरी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यांच्यासार त्यांनी जवळपास ४० टक्के मंत्र्यांना घराचा रस्ता दाखवला आहे. या नेत्यांमध्ये अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा समावेश आहे.

सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान मोदी यांना भावनिक ट्विट केले आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून संदेश देताच चाहत्यांनी तसेच हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सुषमा संपूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दीत ट्विटरवरून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात सक्रीय राहिल्या. त्यांच्या हजरजबाबीपणाची आणि मृदू स्वभावाची ओळख संपूर्ण जगाला झाली.

यांना संधी नाहीच
मंत्रिमंडळात सुषमा स्वराज, सुरेश प्रभू यांचा समावेश होणार की नाही, याबाबत राजधानीत दिवसभर कुतूहल निर्माण झाले होते. गत मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या मेनका गांधी, राधामोहन सिंग, मनोज सिन्हा, महेश शर्मा, विजय गोयल, जयंत सिन्हा, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांना देखील मंत्रिमंडळात संधी मिळू शकली नाही.