मतमोजणीच्या सुरूवातीलाच भाजपा आघाडीवर ; महाराष्ट्रातील स्थिती जाणून घ्या..

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक. या निवणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीलाच देशात भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष पिछाडीवर आहे. भाजपा ६१ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 30 जांगवार, इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीला सुरुवात होताच उमेदवारांची धाकधुक वाढली असून जे उमेदवार पिछाडीवर आहेत त्यांच्या कार्य़कर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
आज देशभरातील लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 542 जागांची मतगणना होत आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत 542 लोकसभा मतदार संघांसाठी एकूण 7 टप्प्यांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक 68.11 टक्के इतके मतदान झाले. ही टक्केवारी 2014 मध्ये झालेल्या मतदानाहून 1.16 टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यातील अनेक दिग्गज नेत्याचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्यातील चुरशीच्या लढती झाल्या असून यामध्ये सातारा, बारामती, मावळ, अहमदनगर, माढा, उस्मानाबाद, सोलापूर या लोकसभा मतदार संघात चुरशीच्या लढती झाल्या. या ठिकाणी कोणता उमेदवार बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्या काही मिनीटामध्येच भाजपाने आघाडी घेतली असून सर्व चित्र स्पष्ट होण्यास उशीर लागण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील स्थिती –
भाजपा – 12
शिवसेना – 2
काँग्रेस – 6
राष्ट्रवादी – 3