दानवेंबद्दलचा खैरेंचा ‘तो’ आरोप खरा ठरला तर… : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता जावाई धर्म पाळल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार चंद्राकांत खैरे यांनी काही दिवसापूर्वी केला होता. यावर बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, खासदार चंद्रकांत खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतल्या पाहिजे. त्यांनी दानवे यांच्याबद्दल केलेला आरोप खरा ठरला तर लोक बिथरतील. संजय राऊत यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जालना लोकसभेसाठी इच्छूक असलेले खोतकर यांची आम्ही समजूत काढली. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे हे दानवे यांच्याबबात सांगत आहेत ते जर खरे ठरले तर लोक बिथरतील. खैरे कधीही खोटे बोलत नाही. कागदोपत्री दानवे यांचे जावाई हे आमचेच आमदार आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

बुरखाबंदीवरून सामनात छापून आलेल्या अग्रलेखावरून शिवसेनेत मतभेत आहेत का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्या अग्रलेखाचा टायमिंग चुकला पण आमच्यात काहीही मतभेत नाहीत. तुम्ही काहीही मनात आणू नका, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मी एकच असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

खैरे यांनी आरोप करताना काय म्हणाले
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत त्यांनी आपल्याला मदत केली नाही असा आरोपही खैरेंनी केला. याची तक्रार भाजपच्या पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरेंना करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दानवेंनी युतीचा नाही तर जावई धर्म पाळला, असा आरोप त्यांनी केला.