बिहारमध्ये एनडीएची आघाडी ; काँग्रेस – आरजेडीची पिछाडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे निकाल हाती येत असून जनतेने कोणाला कौल दिला याचे चित्र स्पष्ट होत आहे. राज्यातील महत्वाचे गणल्या जाणाऱ्या बिहार राज्यात एनडीए आघाडीवर असून काँग्रेस – आरजेडी पिछाडीवर आहे. काँग्रेस – आरजेडीच्या अनेक उमेदवारांना निवडणूक जिंकणे अवघड झाले आहे. बिहारमधून अनेक महत्वाचा नेत्यांनी निवडणूक लढविली आहे.

पटना साहिब लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे शत्रुघन सिन्हा, पाटलीपुत्र मधून काँग्रेस – आरजेडीकडून लढणाऱ्या लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती, बेगूसराय मतदार संघातून सीपीआई कडून लढणारे कन्हैया कुमार पिछाडीवर आहेत. बिहारमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार या जोडगोळीने करिष्मा केला असून एनडीएला ४० लोकसभा मतदारसंघातून ३८ जागा मिळतील असे चित्र आहे. तर दुसरीकडे काँग्रेस – आरजेडीला प्रत्येकी १ – १ जागा मिळेल असे दिसून येत आहे.