अंतर्गत गटबाजीनंतरही उस्मानाबादेत फडकला ‘भगवा’ ; शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर ‘एवढ्या’ मतांनी विजयी

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात झालेल्या लढतीत ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल १,२३,९३५ मतांनी बाजी मारली आहे. उस्मानाबाद मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह आणि वंचित बहुजन आघाडीकडून धनगर समाजाच्या अर्जुन सलगर यांनी निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना ५,८०,५९३ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह यांना ४,५६,६५८ मते मिळाली तसेच वंचित बहुजन आघाडीच्या अर्जुन सलगर यांना ९७,१४० मते मिळाली.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ०४ हजार ८५९ मतदार आहेत. आहेत. त्यापैकी एकूण ११ लाख ९६ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . या मतदार संघात ६३.४२ % टक्के मतदान झाले होते.

शिवसेनेने खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमरगा सोडलं तर बाकीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस – राष्ट्रवादीचा दबदबा आहे. त्यामुळे आघाडीसाठी ही प्रतिष्ठेची लढत होती. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा परिणाम मतदानावर झाला नसल्याचे दिसून आले. गेल्यावेळेस मोदी लाटेचा फायदा शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांना मिळाला होता गेल्यावेळेस येथून राष्ट्रवादीचे नेते पदमसिंह पाटील यांचा पराभव करत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड विजयी झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा पराभव केला होता. २०१९ च्याउस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत ६३.४२% मतदान झाले होते.

——————————————————————————————————-
उस्मानाबाद मतदार संघ
——————————————————————————————————-

एकूण मतदार – १८,८६,२३८

एकूण मतदान – ६३.४२ %

विजयी उमेदवार – ओमराजे निंबाळकर (शिवसेना )

मिळालेली मते – ५,८०,५९३