मैं भी चौकीदार’ भाजपचं नवं व्हिडिओ कॅम्पेनिंग

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचार आणि प्रसारामध्ये सक्रिय झाले आहेत. ‘चौकीदार चौर हैं’ ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम भाजपने सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाउंटवरून सुरुवात करून दिली.


नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे म्हंटल आहे की , ‘तुमचा चौकीदार इथे उभा आहे आणि देशाची सेवा करतोय. पण, मी एकटा नाही. भ्रष्टाचार, अस्वच्छता, सामाजिक तेढ याविरोधात लढणारा देशातला प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणतोय


मी पण चौकीदार.

”चौकीदार चोर हैं’ या शब्दांच्या आधारे काँग्रेसने गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. त्याला पलटवार म्हणून भाजपनं आता थेट व्हिडीओच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. या व्हिडिओला ‘मै भी चौकीदार हूँ’ अशी टॅग लाईन वापरण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि रिट्विट मिळत आहेत.

असा आहे व्हिडिओ –

देशातील प्रत्येक भागातील नागरिकआणि त्यांच्या भावना ‘मै भी चौकीदार हूँ’ या व्हिडीओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या व्हिडीओमध्ये भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास आणि सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकसारख्या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ३१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधा असा शेवट या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

सोशल मीडिया आणि भाजप-

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी सोशल मीडियाचा प्रभावी वापर भाजपाकडून करण्यात आला होता.  रॅली, सभा आणि पोस्टरबाजीसोबतच भाजपने ‘नमो अ‍ॅप’द्वारे काढले होते. या अ‍ॅपद्वारे मोदींच्या नावाचा आणि विचारांचा प्रसार करणारी अनेक उत्पादनांची भाजपने ऑनलाईन विक्री सुरु केली.

तसेच भाजप अध्यक्ष अमित शाहा यांनी मेरा परिवार भाजपा परिवार’ या नव्या कॅम्पेनची घोषणा केली होती. भाजपकडून १२ फेब्रुवारी ते २ मार्च उपक्रमादरम्यान भाजप कार्यकर्त्यांमार्फत देशातील सुमारे ५ करोड घरांवर भाजपचे झेंडे लावले जाणार होते. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी भाजपा समर्थकांनी #ComeAgainModiji हा ट्विटर ट्रेंड सुरु केला आहे. त्यांनतर आता हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे.