जर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू शकतात 92 लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लंडनच्या जिओमिक(Geomiq) या रोबोटीक्स कंपनीला अशा चेहऱ्याचा शोध आहे जो ते आपल्या रोबोटला देऊ शकतात. कंपनी यासाठी त्या व्यक्तीला 92 लाख रुपये देण्यासही तयार आहे. कंपनीची फक्त एकच अट आहे की, रोबोटला दिला जाणारा चेहरा हा दयाळू आणि फ्रेंडली दिसायला हवा. कंपनी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यासाठी एक करार करत त्या व्यक्तीला रक्कम अदा करणार आहे.

जिओमिक कंपनीने म्हटलं आहे की, रोबोटचं नाव व्हर्च्युअल फ्रेंड ठेवण्याचा विचार सुरू आहे. पुढील वर्षी पूर्ण होणाऱ्या या रोबोटसाठी आताच चेहऱ्याचा शोध सुरू आहे. कंपनीने यासाठी अनेक चेहऱ्यांची टेस्ट केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, ज्या चेहऱ्यांची त्यांनी निवड केली आहे त्यांना कंपनीने खासगीरित्या पैसे दिले आहेत.

कंपनी म्हणते की, आम्हाला माहिती आहे की, ही जरा वेगळीच मागणी आहे. कंपनी असे काही चेहरे शोधत आहे जे काहीसे वेगळे असतील. रोबोटीक्स कंपनी जिओमिक आपल्या नव्या प्रोजेक्टवर गेल्या 5 वर्षांपासून काम करत आहे. हा प्रोजेक्ट खूपच सिक्रेट पद्धतीने प्लॅन करण्यात आला आहे. कंपनी सांगते की, रोबोटसाठी ज्या चेहऱ्यांची निवड केली जाईल त्यांचा पूर्ण तपशील रोबोटमध्ये दिला जाणार आहे.

Visit : Policenama.com