लोणीकंद पोलिस स्टेशनला ISO मानांकन !

शिक्रापुर, पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील जाहिर करण्यात आलेल्या स्मार्ट पोलिसिंग मधील गुणवत्ता मानांकनामध्ये लोणीकंद पोलिस स्टेशनला आयएसओ(ISO)मानांकन देण्यात आले आहे. हे प्रमाणपञ लोणीकंद चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी नुकतेच स्विकारले आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलात स्मार्ट पोलिसिंग उपक्रम राबविण्यात येत असुन पोलिस प्रशासन सामान्य नागरिकांना अधिक अनुकुल बनविणे,अधिक प्रशिक्षित पोलिस दल आणि आधुनिक तंञज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे,आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद उपलब्ध करणे,पोलिसांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवुन संवेदनशील आणि विश्वासार्ह पोलिस दल समाजासाठी उपलब्ध करणे हा स्मार्ट पोलिसिंगचा मुख्य हेतु आहे.

या स्मार्ट पोलिसिंग च्या अनुशंगाने गुणवत्ता पडताळणी करुन पुणे व बारामती विभागातील विविध पोलिस ठाण्यांना हे प्रमाणपञ देण्यात आले आहे.लोणिकंद पोलिस स्टेशनला( अ+) हे प्रमाणपञ राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्या पोलिस कर्मचारी सहका-यांनी कोरोनाच्या या अस्थिर परिस्थितीमध्ये व संकटकाळात उत्कृष्ट काम केले. तसेच या काळात लोणिकंद पोलिस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम केले.पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्या टीमने कोरोना योद्धयाप्रमाणे जिवाची बाजी लावून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या, तसेच गुन्हेगारांना कडक शासन करुन गुन्हेगारीला आळा घातला या कार्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते लोणीकंद पोलिस स्टेशनला ISO प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.