गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करुन युवकाला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या युवकाला दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींनी आपण गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करुन लुटल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार खराडी येथे शुक्रवारी (दि.२५) रात्री साडेआठच्या सुमारास हजरत बाबा दर्गा रोडवरील चेरील सोसायटी जवळ घडला.

सुखदेव विठ्ठल गोयकर (वय – ३१ रा. थिटे वस्ती, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी होन्डा ड्रिमयुगा (एमएच १३ डीबी ४१७९) वरील दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

सुखदेव गोयकर आणि त्यांचे मित्र उमेश हुलगे हे चेरील सोसायटीजवळील रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून मोकळ्या जागेत लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन व्यक्ती होंडा ड्रिमयुगा दुचाकीवरुन त्या ठिकाणी आले. त्यांनी आम्ही गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बातवणी केली.

दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने सुखदेव गोयकर यांच्या गळ्यातील २२ हजार ५०० रुपयांची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसका मारून चोरुन नेली. यावेळी त्यांच्या झटापटीत चोरट्यांनी दुचाकी घटनास्थळी सोडून देत तेथून पळून गेले. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक भोसले करीत आहेत.