Low Carbs For Diabetes | डायबिटीजचे रूग्ण बिनधास्त खाऊ शकतात ‘या’ 5 गोष्टी, ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची करू नका चिंता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Low Carbs For Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patients ) आरोग्यदायी आहार (Healthy Diet) घेण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) राहण्यास मदत होते. या दीर्घकालीन स्थितीशी संबंधित गुंतागुंत टाळण्यासाठी, ब्लड शुगर लेव्हल व्यवस्थापित करण्यासाठी सर्व आवश्यक सावधगिरींचे पालन करणे महत्वाचे आहे. काही पदार्थांमुळे ब्लड शुगर लेव्हल नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत होते (Low Carbs For Diabetes).

 

मधुमेहाचा आहार (Diabetic Diet) समजून घेणे वाटते तितके अवघड नाही. अनेकांचे असे म्हणणे असते की, मधुमेहींनी कार्बोहायड्रेट्सचे (Carbohydrates) सेवन कटाक्षाने टाळले पाहिजे, परंतु सत्य हे आहे की आपल्याला योग्य कार्ब (Low Carb For Diabetes) निवडण्याची आवश्यकता आहे. मधुमेही योग्य प्रकारचे कार्ब्ज सुरक्षितपणे मर्यादित प्रमाणात घेऊ शकतात. येथे काही हेल्दी कार्ब्ज (Healthy Carbs) आपण जाणून घेवूयात जे कधीही टाळू नयेत.

 

डायबिटीजमध्ये हे हेल्दी कार्ब खा (Eat This Healthy Carbs In Diabetes)

1. बाजरी (Bajra)
बाजरी हे आणखी एक धान्य आहे जे तुम्ही तुमच्या मधुमेही आहारात समाविष्ट करू शकता. त्यात बहुतेक धान्यांपेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) आहे. यामध्ये फायबर (Fiber) देखील असते ज्यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते.

 

2. ब्राऊन राईस (Brown Rice)
पांढर्‍या तांदळाच्या (White Rice) तुलनेत ब्राऊन राईस कमी प्रक्रिया केलेला असतो. याचा ॠख स्कोअर कमी असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. एका अभ्यासानुसार पांढर्‍या तांदूळाऐवजी ब्राऊन राईसचा आहारात समावेश केल्यास टाइप-2 मधुमेहाचा (Type-2 Diabetes) धोका काही टक्क्यांनी कमी होतो. ब्राऊन राईसमध्ये सुद्धा फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया (Digestion) सुरळीत राहते.

 

3. गव्हाची चपाती (Wheat Chapati)
गव्हाची चपाती मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे चपातीचा आनंद घेऊ शकता. मात्र साखरयुक्त जाम आणि डिप्स वापरणे टाळा. गव्हाचा ब्रेड (Wheat Bread) सुद्धा बनवू शकता.

4. भाज्या (Vegetables)
मधुमेह रूग्ण आपल्या आहारात भाज्या एकापेक्षा जास्त पद्धतीने समाविष्ट करून अनेक पोषकतत्व मिळवू शकतात. सॅलडपासून करीपर्यंत, निवडण्यासाठी बरेच पर्याय आहेत.

 

5. सर्व प्रकारच्या डाळी (All Kinds Of Pulses)
भारतात डाळींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विविध प्रकारे डाळ तयार केली जाऊ शकते. डाळी वनस्पती-आधारित प्रोटीनचा लोकप्रिय स्त्रोत आहेत.
कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ निरोगी ब्लड शुगर वाढवण्यास मदत करतात.
वेगवेगळ्या पदार्थांचे जीआय स्कोअर समजून घेण्यासाठी डॉक्टरांची मदत घेऊ शकता.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Low Carbs For Diabetes | diabetes patients can eat these 5 foods without worry do not worry about increasing blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Narayan Rane | नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयानं दिला हा निर्णय

 

Vaginal Itching मुळे अनकम्फर्टेबल वाटत आहे का?, मग Home Remedies अवलंबा आणि लवकर मिळवा आराम

 

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता ‘या’ मोठ्या आजाराला देऊ शकते निमंत्रण, 6 सुपर फूड्सचा आजच डाएटमध्ये करा समावेश