LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना धक्का ! पुन्हा महाग झाले LPG सिलेंडर, जाणून घ्या नवी किंमत

नवी दिल्ली : जुलैच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी विना अनुदानित एलजीपी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढीची घोषणा केली आहे. 14.2 किलोग्रॅमच्या विना-अनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर दिल्लीत 1 रुपया प्रति सिलेंडर वाढले आहेत. आता नवी किंमत वाढून 594 रुपयांवर आली आहे.

अन्य शहरांत सुद्धा घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात आज वाढ झाली आहे. कोलकातामध्ये 4 रुपये, मुंबईत 3.50 रुपये आणि चेन्नईत 4 रुपयांनी सिलेंडर महागला आहे. मात्र, एक दिलासादायक गोष्ट म्हणजे 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीत जून महिन्यात 14.2 किलोग्रॅमच्या विना-अनुदानित एलपीजी सिलेंडरचा दर दिल्लीत 11.50 रुपये प्रति सिलेंडर महागला आहे. तर, मे मध्ये 162.50 रुपयेपर्यंत स्वस्त झाला होता.

फटाफट चेक करा नवे दर

– आयओसीच्या वेबसाइटवर दिलेल्या दरानुसार दिल्लीत सिलेंडरच्या किमतीत 1 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

– आता दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅमवाल्या विना-अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 593 रुपयांनी वाढून 594 रुपये झाली आहे.

– कोलकातामध्ये 616 रुपयांनी वाढून 620.50 रुपये प्रति 14.2 सिलेंडर झाली आहे. मुंबईत 590 रुपयांनी वाढून 594 रुपये आणि चेन्नईत 606.50 रुपयांनी वाढून 610.50 रुपये 14.2 सिलेंडर झाली आहे.

– 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये दिल्लीत 1139.50 रुपयांनी घटून 1135 रुपयांवर आली आहे.

– तर, मुंबईत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किमत 1197.50 रुपयांनी घटून 1193 रुपयांवर आली आहे.

दरम्यान, गॅस सिलेंडर स्वस्त होईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती पण किंमती मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्व सामान्यांना हा धक्काच आहे.