Ayodhya Case Verdict : ‘अयोध्या’ प्रकरणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर UP च्या सर्व ‘शाळा’ आणि ‘कॉलेज’ला 11 नोव्हेंबर पर्यंत ‘सुट्टी’

लखनऊ : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी (दि. 9) सकाळी साडे दहा वाजता लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोध्येत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून आयोध्येला छावणीचे स्वरुप आले आहे. तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला असून देशातील अनेक राज्यांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला असून उत्तर प्रदेशात 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी (दि.7) सुरक्षेचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी राज्यात मोठा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील वाराणसी, प्रयागराज, आग्रा, मेरठ, लखनऊ, मथुरा, मुरादाबाद, गोरखपूर आणि अलीगडसहित सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागात मोठा बंदोबस्त वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर वॉच
अयोध्येत गस्त घालण्यासोबतच सर्वात जास्त नजर सोशल मीडियावर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक कामाला लावलं आहे. आतापर्यंत 1659 अकाऊंट्स निगराणीत ठेवण्यात आले आहेत. शिवाय अगदीच गरज भासल्यास अयोध्येत इंटरनेट सेवाही बंद केली जाणार असल्याचं पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी सांगितले.

Visit : Policenama.com