COVID-19 : रोज करा ब्रश, ओरल हायजीनने दात- तोंडासह ‘स्वच्छ’ होणार ‘कोरोना’

पोलीसनामा ऑनलाईन : भारतात प्राचीन काळापासूनच तोंडाच्या आत शुद्धतेवर जोर देण्यात आला आहे. घरातील वडीलजनही म्हणतात की, तोंड स्वच्छ केल्याशिवाय काहीही खाऊ नये. दरम्यान, सध्या कोरोना काळात हा सल्ला खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. भारतीय तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार तोंड स्वच्छ करण्याबरोबर हात स्वच्छ करणे देखील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी पोव्हिडोन -आयोडीन (रसायने) गार्गलिंग किंवा तोंड स्वच्छ केल्याने व्हायरसचा संसर्ग रोखू शकतो. या केमिकलसह माऊथ वॉश 40 ते 50 रुपयांमध्ये सहज उपलब्ध आहे.

पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रूग्णांमध्ये क्लोरोहेक्साडाइन किंवा पोव्हिडोन आयोडीनसह गार्गलिंग किंवा स्वच्छ केल्याने व्हेंटिलेटरमुळे होणाऱ्या न्यूमोनियापासून बचाव करता येऊ शकतो, ज्याला व्हेंटिलेटर ऍसिडिटेड निमोनिया म्हणून ओळखले जाते. हे काही वेळा आयसीयू रूग्णांसाठी प्राणघातक ठरते. सामान्यत: दाखल झालेल्या रूग्णांमध्ये न्यूमोनियाचा त्रास असल्यास तो कमी होण्याची शक्यता कमी असते. या आधारावर, तज्ञांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांना हाताची स्वच्छता तसेच तोंडाची स्वच्छता समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे.

आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल ओरल डिसीजमध्ये भारतीय दंत तज्ञांनी पोव्हिडोन-आयोडीन गार्गल एज ए प्रोफेलेक्टिक इंटरव्हेशन टू इंट्रप्ट द ट्रांसमिशन ऑफ सार्स-कोवि-2 विषयावर रिपोर्टमध्ये म्हंटले कि, ओरल हायजिनमुळे घसा आणि तोंडातील स्वछता होते. ज्यामुळे व्हायरस नष्ट होतो.

तोंडाची स्वच्छता कशी करावी
दिवसातून कमीतकमी दोनदा किंवा प्रत्येक वेळी ब्रश केल्यावर 15 मि.ली. माऊथवॉश तोंडात घेऊन हलवावे. ते वापरल्यानंतर ताबडतोब पाण्याने गार्गलिंग करून खाण्याचा किंवा पिण्याचा प्रयत्न करु नका. दरम्यान, दातांची घाण, हिरड्या रोग आणि संक्रमण दूर राहणे, चांगले डेंटलचे हायजिनचे फायदे आहेत, जे आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहेत. तोंडाची स्वच्छता न केल्याने तोंडात वाढणार्‍या बॅक्टेरियामुळे हिरड्यांचा रोग किंवा संसर्ग होऊ शकतो. हे जीवाणू श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकतात. यामुळे तीव्र अडथळा आणणारा फुफ्फुसाचा रोग आणि न्यूमोनियासारख्या श्वसन संक्रमणाचा धोका वाढतो.