CM योगी यांना जीवे मारण्याची धमकी, यूपी 112 च्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवला मॅसेज, पथकांकडून तपास सुरू

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून मोठी बातमी आहे. राज्याचे सीएम योगी आदित्यनाथ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. मुख्तार अन्सारीला जेलमधून न सोडल्याने ही धमकी देण्यात आली आहे. यूपी 112 च्या व्हाट्सअप नंबरवर धमकीचा मॅसेज आला आहे. 9696755113 या नंबरवरून मॅसेज पाठवण्यात आल्याचे समजते. सध्या याप्रकरणी हजरतगंज पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. पोलीस आणि सायबर सेलच्या टीम तपास करत आहेत.

यापूर्वीही आले मॅसेज, झाली अटक
सीएम योगी यांना यापूर्वीही धमकीचे मॅसेज यूपी 112 कडे आले आहेत. ज्यानंतर लखनऊमध्ये मुख्यमंत्री निवासची सुरक्षा वाढवण्यात आली होती. याच वर्षी जूनमध्ये यूपी पोलिसांची इमर्जन्सी सर्व्हिस यूपी 112 च्या व्हॉट्सअप नंबरवर एक धमकीचा मॅसेज आला, ज्यामध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यापूर्वी मे महिन्यात सुद्धा अशाच एका मॅसेजप्रकरणी मुंबईच्या कामरान अमीनला यूपी एसटीएफने अटक केली होती.

बेरोजगार होता युवक
मुंबई एटीएसने अटक केलेला आणि सीएम योगींना धमकी देणारा व्यक्ती कामरान मुंबईचा राहणारा आहे. झवेरी बाजारात सिक्युरिटी गॉर्डची नोकारी करणार्‍या कामरानचे 2017मध्ये स्पाइन टीबीचे ऑपरेशन झाले होते, ज्यानंतर त्याने नोकरी सोडली होती आणि सध्या बेरोजगार आहे. कामरानच्या कुटुंबात आई, बहिण आणि एक भाऊ आहे, बेरोजगारीने त्रस्त कामरानने याच त्रासातून हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like