माढा : अंजनगावात पत्नीचा टिकावाने केला खून

ADV

माढा –  अंजनगाव (खेलोबा) गावात पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लोखंडी टिकाव घातल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.घरामध्ये पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पतीने आपल्या पत्नीला लोखंडी टिकावाने तोंडावर घाव घालून ठार केले. कोमल बापू देवकुळे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बापू लक्ष्मण देवकुळे याच्यावर माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी बापू देवकुळे यास अटक केली आहे.

पती बापू देवकुळे व पत्नी कोमल या दोघांत सोमवारी रात्री नऊ वाजता घरात घरगुती कारणावरून भांडणे झाली होती.दरम्यान भांडणाचा राग अनावर झालेल्या बापू याने पत्नी सोबत घरांच्या बाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झोपली असता पतीने टिकावाने हल्ला केला. कोमल यांना उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला.

ADV

पोलिस पाटील अनिरुध्द पुरुषोत्तम पाटील यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली. रागाच्या भरात हे कृत्य केले असल्याची कबुली पती बापू लक्ष्मण देवकुळे यानेे दिली असल्याचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी सांगितले.मुलांनी फोडला हंबरडा कोमल यांच्या मृत्यूने आपली आई आपल्याला सोडून गेल्याचे समजताच आठ वर्षे व सहा वर्षांच्या दोघा मुलांनी हंबरडा फोडला. आई तू आता माघारी कधी येणार, असे म्हणत ही चिमुरडी ओक्सा-बोक्सी रडत होती. नातेवाईकांनीदेखील गावात आक्रोश केला. गाव दु:खात बुडालेले दिसून आले.

आरोग्यविषयक वृत्त

गोडपदार्थ खाताना ‘ही’ काळजी घ्या आणि दातदुखीच्या समस्या टाळा

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध

आश्चर्यजनक ! विजेचा धक्का लागणे मेंदूसाठी उपायकारक

इंटरनेटचा अतिरेकी वापर करतो मेंदूच्या ‘या’ क्षमतांवर परिणाम

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

सिने जगत

‘बेबी डॉल’ सनी लिओनीला पुरुषांची ‘ही’ गोष्ट फारच आवडते

अभिनेत्री कियारा आडवाणीला ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीशी ‘समलिंगी’ संबंध ठेवण्याची ‘तीव्र’ इच्छा