‘लॉकडाऊन’मध्ये डान्स शिकतेय माधुरी दीक्षित, व्हिडीओ कॉलवर घेतेय ‘क्लासेस’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या लॉकडाऊनचा सदुपयोग करताना दिसत आहे. घरात बंद असली तरीही तिनं आपली डान्स प्रॅक्टीस मात्र सुरूच ठेवली आहे. सध्या ती आपल्या गुरूकडून डान्स क्लासेस घेताना दिसत आहे. व्हिडीओ कॉलच्या साहाय्यानं ती डान्स विद्या घेत आहे.

माधुरी दीक्षितनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत माधुरी दीक्षित तिची कथ्थकची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की तिचे गुरू तबला वादन करत आहेत आणि माधुरी रियाज करत आहे. व्हिडीओ शेअर करताना माधुरी म्हणते, “या मौल्यवान वेळेला वाया घालवू नका. याचा पूर्ण वापर करा. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.

माधुरी दीक्षित अॅक्टींगव्यतिरीक्त डान्समध्येही खूप पारंगत आहे. तिच्या लुकचे चाहते दीवाने आहेत. आजही माधुरी दीक्षित तितकीच यंग, फिट आणि ब्युटीफुल दिसते.

अलीकडेच माधुरीनं लोकांना फ्री डान्स ट्रेनिंग देण्याची घोषणा केली होती. सोशल मीडियावरून तिनं याबाबत माहिती दिली होती. माधुरी म्हणाली होती की, “1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत DanceWithMadhuri.com वर तिचे डान्स सेशन मोफत उपलब्ध असतील.

https://www.instagram.com/p/B9Wqt7WHzUd/

https://www.instagram.com/p/B9WqxbfHbeK/

https://www.instagram.com/p/B9TG0xGH-vK/

https://www.instagram.com/p/B9EJY8AHSoy/

https://www.instagram.com/p/B9EJTWMH5cu/

https://www.instagram.com/p/B9EJSCGnEbT/

https://www.instagram.com/p/BotOo2DhZcS/