आंब्याच्या ट्रकमध्ये लपून प्रवास जीवावर बेतला ! ट्रक उलटून 5 जणांचा मृत्यु तर 13 गंभीर जखमी

भोपाळ : मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात आंब्याचा भरलेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात ५ मजूरांचा मृत्यु झाला आहे़ ट्रकमधील १३ मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हे सर्व मजूर लपून आंब्याच्या ट्रकमध्ये बसून हैदराबादहून उत्तर प्रदेशातील झाशीला जात होते.

लॉकडाऊनमध्ये घरी जाण्याची व्यवस्था नसल्याने हे मजूर आंब्याच्या ट्रकमध्ये लपून बसून झाशीला जात होते. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील पाठा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चालकचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. त्यात आंब्याखाली दबले जाऊन ५ कामगारांचा मृत्यु झाला. अन्य १३ मजूर जखमी झाले असून त्यातील २ गंभीर जखमी झालेल्या जबलपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातातील जखमींपैकी एका मजूराला काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होता. हे रुग्णालयात दाखल केल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे मृत मजूरांसहीत ट्रकचालकापासून सर्वांचे कोरोना नमुने घेण्यात आले आहेत