निवडणूक जिंकण्यासाठी ‘गिफ्ट’ दिलं, हारल्यानंतर ‘सामान’ परत मागितलं, त्यानंतर जनतेनं ‘असा’ सबक शिकवला

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक वेगळे प्रकरण समोर आले आहे. छत्तीसगढ येथील रायपूरमधील उमेदवाराने निवडणूक जिकंण्यासाठी अनेक प्रकारच्या भेटवस्तू वाटल्या. मनोहर देवांगनने घराघरात जाऊन साड़ी, मिक्सर ग्राइंडर, कुकर कपड़े यांच्यासोबत अनेक प्रकारच्या भेटवस्तू वाटल्या. मात्र निकाल लागवल्यावर आपला पराभव झाल्याचे समजताच उमेदवाराने लोकांना दिलेल्या भेटवस्तू परत माघायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी देखील मनोहरला धडा शिवण्यासाठी सर्व सामान गावातील बस स्टॅन्ड वर आणून ठेवले.

निवडणुकीसाठीं जय्यत तयारी केली लोकांनी काही न मागता मनोहरने घरा घरात जाऊन अनेक भेटवस्तू वाटल्या मात्र एवढे करून देखील लोकांनी मतदान न केल्याने चिडलेल्या उमेदवाराने अखेर लोकांना वाटलेल्या वस्तू परत मागायला सुरुवात केली.

एवढेच नाही तर पराभूत उमेद्वाराकडून लोकांना शिव्या देखील दिल्या गेल्या. गावातील लोकांना या गोष्टीची खूप चीड आली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी मनोहरने दिलेले सर्व सामान गावातील बस स्टॅण्डवर आणून ठेवले. आरंग पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.