मध्य प्रदेशातील महासंग्राम ! 200 वर्षांपेक्षा देखील जुनी आहे ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंहांच्या कुटूंबातील वर्चस्वाची ‘लढाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशात १९९३ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी दिग्विजय सिंग आणि माधव राव सिंधिया यांचे नाव पुढे होते. परंतु या दोघांमध्ये दिग्विजय सिंह यांनी बाजी मारली. यापूर्वीही १९८५-९० मध्ये राजीव गांधी आपले मित्र माधव राव यांना अर्जुन सिंग आणि मोतीलाल व्होरा यांच्यामूळे मुख्यमंत्री पदासाठी प्राधान्य देऊ शकले नाहीत.

तसेही मध्य प्रदेशच्या राजकारणात राघोगड आणि सिंधिया कुटुंबांमधील परस्पर स्पर्धेची कहाणी काही कमी स्वारस्यपूर्ण नाही. या स्पर्धेची कहाणी जवळपास २०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. जेव्हा सिंधिया घराण्याच्या दौलतराव सिंधिया यांनी राघोगडचे राजा जयसिंगांना युद्धात हरवले, तेव्हा राघोगडला ग्वाल्हेरला स्वाधीन जावे लागले होते. याचा बदला दिग्विजय सिंग यांनी १९९३ मध्ये माधव राव सिंधिया यांना पराभूत करून घेतला. त्यामुळे एकेकाळी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करणारे ज्योतिरादित्य सिंधिया यांना ठाऊक आहे की ते आज जी काही गुंतवणूक करत आहेत, त्याचा परतावाही येत्या काळात चांगला मिळेल.

राहुल गांधी यांनी देखील केली नाही मदत

डिसेंबर २०१२ मध्ये देखील राहुल गांधी आपले मित्र ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मध्यप्रदेशची कमान सोपवू शकले नव्हते. दरम्यान ज्योतिरादित्यांना मध्यप्रदेश मुख्यमंत्री पदावर अनेक कारणांनी मजबूत मानले जाते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते सिंधिया राजघराण्यातून आहेत, जे की भारतीय राजकारणात एक महत्वाचे आणि जुने घराणे मानले जाते. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील राजकारणी म्हणून प्रस्थापित झाले आहेत.

राजकारणात पराभवाचा सामना करावा लागला

तसेही हे सांगणे तसे चुकीचे ठरणार नाही की ज्योतिरादित्य सिंधिया हे मागील काही काळापासून राजकीय कारकिर्दीत मागे पडलेले दिसत आहेत. त्यांना २०१८ मध्ये कमलनाथ यांच्याकडून मुख्यमंत्रीच्या रेसमधून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर संसदीय प्रतिनिधी राहिलेले केपी यादव सोबत सन २०१९ मध्ये पारंपरिक लोकसभा सीटवर त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्याच निवडणुकीदरम्यान, पश्चिम उत्तर प्रदेशात ज्या पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती, तेथेही पक्षाला आपले खाते उघडता आले नव्हते.

सिंधिया यांना पुरेसे पाठबळ नसल्याने त्यांनी कमलनाथ सरकारच्या बाजूने चालण्याचा निर्धार केला. निवडणुकीत हार पत्करल्यानंतरही सिंधिया हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. परंतु कमलनाथ हे खुर्चीत बसले. तसेच त्यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याचे आश्वासन मिळाले पण पद नाही. शिवाय लुटीयन दिल्लीत त्यांना आपल्या पसंतीचे घर देखील मिळाले नाही आणि त्यांना मिळणारे घर हे नकुल नाथ यांना देण्यात आले.

या सर्व घटनांमधून दुखावले गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या नाराजीचे स्पष्ट संकेतही दिले. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून काँग्रेसी असण्याची ओळख देखील काढून टाकली. तरीदेखील त्यांच्याकडे कुणी लाक्ष न दिल्याने त्यांनी भाजपचा मार्ग धरला.