Maha Vikas Aghadi | ‘महाराष्ट्रात सुरू असलेला प्रयोग मिनी यूपीएचा’; संजय राऊतांचं मोठं विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maha Vikas Aghadi | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज (मंगळवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरुन आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना (Shiv Sena) आता यूपीएमध्ये (UPA) सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेवरुन संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. (Maha Vikas Aghadi)

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ‘काँग्रेस पक्ष (Congress) राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) मिळून सत्ता स्थापनेसाठी एकत्र आला. तिन्ही पक्षांचं मिळून उत्तम सरकार स्थापन सुरूय. तिन्ही पक्षांत संवाद असावा असं आम्हाला वाटतं आणि त्यानुसार मी दिल्लीत असलो आणि ते दिल्लीत असले तर आम्ही एकमेकांना भेटून चर्चा करतो. महाराष्ट्रातील राजकारण, सरकारचे कामकाज आणि एकंदरित देशातील भविष्यातील घडामोडींवर परिस्थितीवर चर्चा होते. 5 राज्यांत निवडणुका होताहेत. त्यापैकी गोव्यात आम्ही निवडणुका लढवणार आहोत. युपीमध्ये निवडणुका लढवण्याबाबत आम्ही चाचपणी करत आहोत. अशावेळी काँग्रेस पक्ष गोव्यात आणि उत्तरप्रदेशातही निवडणूक लढवत आहे. यावरुन चर्चा झाली तर नक्कीच त्यावर चर्चा होईल. (Maha Vikas Aghadi)

पुढे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिवसेना यूपीएचा (UPA) भाग होणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘हा प्रश्न आता तुम्ही कशासाठी विचारताय. त्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) योग्य वेळी निर्णय घेतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) भिन्न विचारांचे 3 पक्ष आहेत. महाराष्ट्रात जो प्रयोग सुरू आहे तो मिनी यूपीएचाच (UPA) प्रयोग आहे. असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

‘आम्ही महाराष्ट्रात एकत्र आहोत. संसदेत लोकसभा किंवा राज्यसभेत काही निर्णय घेताना आम्ही सर्व एकत्र आहोत.
गोव्यात गोमंतक पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने आघाडी स्थापन केलीय. ज्याअर्थी शिवसेना त्यांच्या आघाडीत नाहीये त्याअर्थी शिवसेनेला त्या आघाडीत जायचं नाही.
गोव्याच्या जनतेची मानसिकता आम्हाला चांगली माहिती आहे. गोवा आणि महाराष्ट्राचं एक खास नातं आहे.
एकवेळ आम्ही स्वतंत्र लढू पण कोणत्या आघाडीसोबत जायचं याबाबत आम्ही शंभर वेळा विचार करु,’ असं देखील राऊत म्हणाले.

 

Web Title :- Maha Vikas Aghadi | maha Vikas aghadi is experiment of mini upa said sanjay raut before meeting with rahul gandhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | 50 हजाराचे लाच प्रकरण ! पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं बारामती सेशन कोर्टातील पोलिसाला घेतलं ताब्यात

PMSYM | दररोज 2 रुपये भरा आणि मिळवा महिन्याला 3 हजार रुपयांची पेन्शन; जाणून घ्या योजना

Nagar Urban Co-Op Bank | रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर घातले निर्बंध; खातेदारांना केवळ 10 हजार रुपये काढता येणार