महाड इमारत दुर्घटना : तब्बल 40 तासांनी बचावकार्य पूर्ण !

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. रायगड जिल्ह्यातील महाडमधील ही घटना आहे. सोमवारी(दि 24 ऑगस्ट) रात्री 7 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. तारीक गार्डन असं या इमारतीचं नाव आहे. अखेर 40 तासांनी इमारतीचं मदत व बचावकार्य पूर्ण झालं आहे. या दुर्घटनेत तब्बल 16 जाणांचा मृत्यू झाला आहे. यात 7 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यातून 9 जणांना सुखरूप बाहेर काढ्यात आलं आहे. यात 5 पुरुष, 3 महिला आणि 1 बालकाचा समावेश आहे असं समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहारातील काजळपुरा भागात ही इमारत होती. कोसळलेल्या इमारतीचं नाव तारीक गार्डन आहे. या इमारतीत 47 फ्लॅट होते. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक बचाव पथकं आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी मदत व बचावकार्य सुरू केलं होतं. सलग 40 तास हे कार्य सुरू होतं. सर्व शासकीय यंत्रणा देखील घटनास्थळी तळ ठोकून होत्या.

24 ऑगस्टर रोजी ही घटना घडली होती. 24 तारखेला 8 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं होतं. यात एकाचा मृत्यू झाला होता. 25 तारखेला मध्यरात्री मध्यरात्री 1 वाजल्यापासून राष्ट्रीय आपत्ती दलाच्या जवानांनी मदत व बचाव कार्याचा ताबा घेतला होता. दुपारी 12 वाजता पहिला मृतदेह आढळून आला होता. नंतर टप्प्याटप्प्यानं 14 मृतदेह आढळून आले होते.

4 वर्षांचा मोहम्मद बांगी याला दुर्घटनेच्या 18 तासांनी तर 60 वर्षांच्या मेहरूनीसा अब्दुल हमीद काझी यांना 26 तासांनंतर ढिगाऱ्याखालून सुखरूखपणे बाहेर काढण्यात आलं. हे दोघेही भीषण दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. 26 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपर्यंत उर्वरीत दोन बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढले. यानंतर हे मदत व बचावकार्य थांबवण्यात आलं होतं.