नांदेड, उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांसह 4 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) नांदेड आणि उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. नांदेड आणि उस्मानाबादला नवीन पोलिस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नांदेडचे पोलिस अधीक्षक संजय बी. जाधव (आयपीएस) यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे तर सोलापूर शहरात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले विजय कुमार मगर (IPS) यांची नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राजा रामसामी (आयपीएस) यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलिस दलातील उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या राज तिलक रोशन (IPS) यांची उस्मानाबदच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –