‘शिवस्मारकात भाजपने घोटाळा केला’ : काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात भाजपने भ्रष्टाचार केला आहे असे म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सत्ताधारी भाजपवर घोटाळ्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘शिवस्मारकाच्या कामात भाजपने भ्रष्टाचार केला आहे’
भाजपचे नेते दावा करत आहेत की, गेल्या पाच वर्षात सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही. अशात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. नवाब मलिक म्हणाले की, “ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आले त्यांच्या स्मारकामध्येच भाजपने भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन झाले होते. मात्र आजही स्मारकाचे काम सुरु झाले नाही. याउलट शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे.” असा आरोप त्यांनी केला.

‘हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आजच या आरोपांचा खुलासा करावा’
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी भ्रष्टाचाराची कागदपत्रेही सादर केली. आम्ही दुसऱ्या टप्प्यात आणखी कागदपत्रे सादर करू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. इतकेच नाही तर, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आजच या आरोपांचा खुलासा करावा असे आव्हानही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या मेट्रो विभागातही भ्रष्टाचार झाला आहे असा गंभीर आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

Visit : policenama.com