CM ऑफीस, RSS आणि 50 कोटी, नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष यात्रा काढून मतदारांशी संवाद साधत आहेत. यात्रेदरम्यान विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्यात येत असून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. काँग्रेसने सुरु केलेल्या महापर्दाफाश यात्रेदरम्यान काँग्रेसचे नते नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री कार्य़ालयातून दर महिन्याला 50 कोटी रुपये संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात असल्याचा आरोप केला आहे. तर गिरिष महाजन यांना जोकरमंत्री म्हणत त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.
भाजपाने सुरु केलेल्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महापर्दाफाश यात्रा काढली आहे.

या यात्रेला अमरावतीमधून सुरुवात झाली आहे. यात्रा सुरु होताच नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेत्यांवर सडकून टीका करत गंभीर आरोप केले आहेत. पक्षांच्या निघत असलेल्या वेगवेगळ्या यांत्रामुळे विधानसभेची धामधूम सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गिरीश महाजन जोकरमंत्री –

भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर तोंडसूख घेताना नाना पटोले यांनी गिरीश महाजन हे तर जोकरमंत्री असल्याची जहरी टीका केली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूरावरून पटोले यांनी महाजन यांच्यावर ही टीका केली आहे. महाजन यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सेल्फी काढला. हाच मुद्दा पकडत महापर्दाफाश यात्रेत नाना पटोले यांनी महाजन यांच्यावर टीका केली आहे.

महापर्दाफाश यात्रेत पटोलेंचे आरोप –

विकास केवळ देवेंद्र फडणवीस यांचा झाला. सरकाचे खाते अमृता फडणवीस या काम करत असलेल्या बँकेत वळवले. सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीत टेंडर न काढता कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला. पाच वर्षात ओबीसींची शिषवृत्ती थांबवली. हे सरकार SC, ST, OBC विरोधी आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या