सुनील कांबळे यांच्या विजयाची खात्री : खासदार गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महायुती हे एक मोठे कुटुंब असून या निवडणुकीत प्रत्येक घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपले कर्तव्य चोख बजावतील, त्यामुळे सुनील कांबळे यांच्या विजयाची खात्री आहे, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

महायुतीच्या भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), शिवसंग्राम, रयतक्रांती, रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पातळीवर काम करत आहेत. या निवडणुकीत ते एकदिलाने काम करीत आहेत. आपली ताकद एकवटून सुनील कांबळे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहनही यावेळी बापट यांनी केले.

कॅन्टोन्मेंटमध्ये नागरिकांच्या विविध समस्या आहेत. त्यातील केंद्राच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि राज्य सरकारच्या पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सुनील कांबळे प्रयत्न करतील, असेही बापट यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे, सदानंद शेट्टी, गणेश बीडकर, उत्तरप्रदेशातील आमदार रवि सतिजा, शिवसेनेचे संजय मोरे, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, अभय वाघमारे, शिवसेना नगरसेविका पल्लवी जावळे, भाजपच्या नगरसेविका मनिषा लडकत, प्रियांका श्रीगिरी, किरण मंत्री, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, भाजप कॅन्टोन्मेटचे संतोष इंदूरकर, संदीप लडकत, मुकुंदराव गायकवाड, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, बाळासाहेब जानराव संजय सोनवणे, महिपाल वाघमारे, शैलेंद्र चव्हाण, उत्तम भुजबळ आदींसह महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रवि सतिजा यांची फटकेबाजी
उत्तरप्रदेशातील आमदार रवी सतिजा यांनी या मेळाव्यात व्यासपीठावरून जोरदार भाषण केले. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीतील अनेक उदाहरणे देत त्यांनी विरोधी पक्षांवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या हिंदीतील भाषणाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी