शिवसेनेची डोकेदुखी वाढली ! ‘या’ खासदाराच्या मुलानं केली पक्षाविरूध्द ‘बंडखोरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीत रंगत येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता काही नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. काही नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने बंडाचा झेंडा उगारला असून विरोधी पक्षांकडे जाण्याचा प्रयत्न सुरु केला आहे तर काही जणांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे.

त्यामध्ये आघाडीपेक्षा युतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होताना दिसून येत असून अनेक नेत्यांनी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदविरोधात बंडखोरी केली आहे. त्यानंतर आता श्रीरामपूरमध्ये खुद्द शिवसेनेच्या खासदारपुत्राने आपल्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे यांनी पक्षाकडे श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मागितली होत, मात्र पक्षाने त्यांना डावलून नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले भाऊसाहेब कांबळे यांना पक्षाने तिकीट दिल्याने नाराज झालेल्या लोखंडे यांनी बंडखोरी केली आहे. याआधी देखील अनेक उमेदवारांनी अशा प्रकारे बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार अर्ज मागे घेतात आणि पक्ष या बंडोबांना कशा प्रकारे शांत करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

visit : Policenama.com