Exit Polls : ‘दक्षिण कराड’मधून पृथ्वीराज चव्हाण ‘डेंजर झोन’मध्ये ! जाणून घ्या शिवेंद्रराजे भोसले, पंकजा मुंडेंचं काय होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचा निकाल समोर आला आहे. आयपीएसओएस(IPSOS)च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला 141 जागा आणि शिवसेनेला 102 जागा मिळणार असल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर महायुतीच्या खात्यात 243 जागा येताना दिसत आहेत. याशिवाय राज्यात काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 22 जागा मिळताना दिसत आहेत.

राज्यातील व्हीव्हीआयपी जागांबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून विजय मिळवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे हेदेखील विजयी होणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे उमेदवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव होण्याची चिन्हे आहेत.

कोथरुडचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे देखील विजय निश्चित करू शकतात. भाजपचे शिर्डीचे उमेदवार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेदखील विजयी होण्याची शक्यता आहे. परळीतील भाजप उमेदवार आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या देखील आपली जागा सुरक्षित करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे उमेदवार होऊ शकतात विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर बारामतीतून लढणारे अजित पवार एक्झिट पोलनुसार काट्याची टक्कर देताना दिसत आहेत. येवला या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आपली जागा सुरक्षित करताना दिसत आहेत. दक्षिण कराडमधून काँग्रेसचे उमेदवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपली जागा गमावताना दिसत आहेत.

लातूर शहराबद्दल बोलायचे झाले तर विद्यमान आमदार अमित देशमुख पराभवी होताना दिसत आहेत. भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण आपली जागा गमावतील अशी चिन्हे आहेत. साताऱ्याबद्दल सांगायचे झाले तर भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंह भोसले चांगलीच टक्कर देताना दिसत आहेत.

Visit  :Policenama.com