भाजप उमेदवाराची माघार ! विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले बिनविरोध होणार हे ‘स्पष्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, किसन कथोरे १ लाख ७४ हजार मते मिळवून विजयी झाले होते.  आपली परंपरा लक्षात घेऊन ही निवडणुक बिनविरोध व्हावी, असे ठरविण्यात आले. त्यामुळे आताच किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Visit : Policenama.com