शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आज ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पाशर्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक देण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थाना बाहेरही आंदोलकांचा ठिय्या सुरु आहे.

शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा याआधीच आंदोलकांकडून देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी ९ वाजताच आंदोलक गोविंदबागबाहेर जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घराबाहेर आले आणि ते देखील आंदोलकांसोबत घोषणाबाजी देऊ लागले. पवार कुटुंबीयांपैकी सध्या अजित पवारच गोविंदबागमध्ये आहेत.
[amazon_link asins=’B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0aeeda27-9ba3-11e8-a674-e7c72e9671fc’]

का झाले शरद पवार टार्गेट ?

मराठा समाजाने आता थेट शरद पवार यांना टार्गेट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार एकीकडे पाठिंबा जाहीर करतात, तसेच आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात दयावे असेही म्हणतात तसेच घटना दुरुस्तीला देखील मदत करू अशा दुटप्पी भूमिका मांडल्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्मण झाला आहे. त्यामुळे बारामती तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शरद पवार यांच्या शारदानगर येथील निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्‍यातील मराठा समाजातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील युवक आणि समाज बांधव सहभागी झाले आहेत.

दरम्यान, याआधी आठ वर्षांपूर्वी ऊस आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर आज पवारांच्या घराबाहेर ठिय्या देण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या घरासमोरील आंदोलनात अजित पवार सहभागी