Maharashtra BJP | ‘शरद पवार साहेब, भाजपाची काळजी करु नका, तुम्ही पावसात भिजूनही…’ भाजपनं राष्ट्रवादीला डिवचलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra BJP | मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालं आहे. भाजपकडून एकामागे एक असे आरोप महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि नेत्यांवर करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा एकही मुद्दा भाजप सोडत नाहीये. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या युवा आमदारांची (MLA) भेट घेतली. शरद पवारांनी युवा आमदारांना सांगितलं की, ‘घाबरु नका, राज्यात भाजपची सत्ता पुन्हा मी येऊ देणार नाही.’ शरद पवारांच्या या निर्धारावरुन भाजपने (Maharashtra BJP) निशाणा साधला आहे.

 

महाराष्ट्र भाजपने (Maharashtra BJP) ट्विट करत म्हटलं, आदरणीय शरद पवार जी, कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत (Democracy) जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल.

 

 

 

 

महाराष्ट्र भाजपने आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले की, आदरणीय शरद पवार साहेब, भाजपची काळजी करु नका! स्वत:च्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी (Regional Parties) 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत (Political Career) स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री (CM) बनवून दाखवा.

 

तिसऱ्या ट्विटमध्ये भाजपने म्हटले, भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडवून दाखवा!

– राज्यात एसटी (ST) बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर (Employees Strike) आहेत.

– राज्यात शेतकऱ्यांची वीज (Power) तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत.

– मराठा (Maratha Reservation), OBC आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न सोडवून दाखवा.

भाजपने केलेल्या या तीन ट्विटनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देते हे पहावे लागेल.

 

 

Web Title :- Maharashtra BJP | bjp targets ncp chief sharad pawar on election challenge in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Protein Diet | हेल्दी राहण्यासाठी शाकाहारी लोकांनी ‘डाएट’मध्ये सहभागी कराव्यात प्रोटीनने समृद्ध ‘या’ 7 भाज्या; जाणून घ्या

 

Sanjay Raut | ‘होळी वर्षातून एकदा येते, मात्र भाजपवाल्यांचा शिमगा दररोज’, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

 

Pune Crime | टोळक्याचा धुडगुस ! कात्रज-कोंढवा रोडवरील पेट्रोल पंपाच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण; भारती विद्यापीठ पोलिसांकडून चोघांविरूध्द गुन्हा