महाराष्ट्र बजेट 2020 : ठाकरे सरकारकडून शेतकर्‍यांना भेट, जाणून घ्या महत्वाच्या 12 ‘या’ गोष्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सरकारचे पहिले बजेट सादर केले. यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी सरकार कायदे करेल असे अर्थमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्र सरकारच्या या बजेटमध्ये शेतकरी केंद्रबिंदू असल्याचे दिसून आहे. राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतची कर्जे माफ केली जाणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, हे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजित पवार यांनी आर्थिक पाहणी केली, ज्यातील निदर्शनानुसार, या वेळी राज्याला मागील वेळेपेक्षा ५७ हजार कोटींचा अधिक भार पडला आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रावर एकूण ४७१६४२ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा आहे.

बजेटमधील महत्वाच्या गोष्टी …
1) दोन लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होईल.
2) राज्यातील ८० टक्के लोकांना रोजगार मिळावे यासाठी सरकार कायदे करेल.
3) ऊर्जा क्षेत्रातील विकासासाठी ८ हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल.
4) १०७४ ग्रामपंचायत इमारतींसाठी १ हजार कोटी रुपये मंजूर झाले.
5) आमदारांना स्थानिक क्षेत्र विकास (एलएडी) निधी २ वरून ३ कोटी करण्यात आला.
6) ५ वर्षात ५ लाख तरुणांना नोकर्‍या मिळणार.
7) डॉक्टरांची संख्या वाढविली जाईल.
8) प्रथमोपचार यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ५००० कोटींचा खर्च केला जाईल.
9) मुंबई-गोवा महामार्गावरील जमीन संपादन करण्यासाठी १२०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
10) बंदरांच्या विकासासाठी २७६ कोटी रुपये खर्च केले जातील.
11) नवी मुंबईत महाराष्ट्र भवन बांधले जाणार.
12) पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन होईल.