Maharashtra Cabinet Decision | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अप्पर आयुक्तांसह 3 नवीन पदनिर्मिती, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) येथे अपर पोलिस आयुक्त (Addl CP) व पोलीस उपआयुक्तांची (DCP) दोन अशी एकूण तीन पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

 

 

 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगीकीकरण, वाढत्या वाहन संख्येमुळे दुर्घटना, गुन्हेगारीतील वाढ यामुळे कामाची व्याप्ती वाढलेली असल्याने, हा निर्णय (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला. पदनिर्मितीमुळे वार्षिक 1 कोटी 32 लाख एवढा खर्च येणार आहे.

 

पर्यटन उपविभागासाठी उप सचिव

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Tourism and Cultural Affairs Department) पर्यटन उपविभागासाठी उप सचिव पद निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागासाठी ५४ पदाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, याविभागात कामकाज वाढल्यामुळे हे नवीन पद निर्माण करण्याची गरज आहे.

 

Web Title :  Maharashtra Cabinet Decision | Creation of 3 new posts including Upper Commissioner in Pimpri-Chinchwad Police Commissionerate, decision in Cabinet meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा