राधाकृष्ण विखेंच्या बालेकिल्ल्याला ‘सुरुंग’ लावण्यासाठी ठाकरे सरकारची ‘पावर’फुल खेळी ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काल ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला त्यावेळी महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली विशेष म्हणजे यावेळी ठाकरे सरकारकडून विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी खेळी करण्यात आली आहे. विखेंचे शत्रू समजले जाणारे गडाख, तनपुरे आणि थोरात कुटुंबात मंत्रीपदे देऊन विखेंना घेरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जात आहे.

एका पक्षात असून थोरात आणि विखे यांच्यातील संघर्ष उघड होता मात्र नंतर विखे भाजपमध्ये गेल्याने आता सत्ताधारी आणि विरोधक असा थेट संघर्ष पहायला मिळणार आहे त्यामुळे विखेंच्या विरोधकांना सध्या ताकद दिली जात आहे. त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळ विस्तारात देखील त्यांच्या शत्रुंना ताकद दिली असल्याचे समजते. राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांना पराभूत करत प्राजक्त तनपुरे आमदार झाले आहेत. कर्डीले यांना पराभूत करण्यासाठी विखेंनी तनपूरेंना मदत केल्याची चर्चा आहे तर कर्डीले यांनी तर थेट पक्षाकडेच विखेंविरोधात तक्रार केली आहे. तनपुरे आणि विखे यांच्यात खरं तर पारंपारिक राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे विखेंची कोंडी करण्यासाठी तनपुरे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.

1991 मध्ये झालेली यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील लोकसभेची निवडणूक अनेकांना माहिती आहे. यानंतर दोनीही गटामध्ये शत्रुत्वाचे वातावरण तयार झाले होते. जे की अजूनही कायम आहे. आजही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गडाखांची ताकद मोठी आहे. सध्या जिल्हा परिषद ही विखेंच्या पत्नी शालिनीताई विखे यांच्याकडे आहे मात्र आता पक्ष बदलल्यानंतर विखे आपले वर्चस्व कायम राखणार का ? हे पाहन महत्वाचं ठरणार आहे. त्याच अनुषंगाने विखेंना सुरुंग लावण्यासाठी त्यांच्या विरोधकांना मंत्री पदांच्या रूपाने ताकद देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा