Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामांतर (Rename) करण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) करण्यात आली होती. औरंगाबाद शहराचं नामकरण करुन संभाजीनगर (Sambhajinagar) केलं पाहिजे असा प्रस्ताव अनिल परब (Anil Parab) यांनी मांडला होता. या प्रस्तावाला आज झालेल्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) मंजूरी देण्यात आली आहे. याशिवाय उस्मानाबादचे (Osmanabad) देखील नामकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. उस्मानाबादचे नामकरण धाराशीव (Dharashiv) करण्यात आले आहे. तसेच नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील (D.B. Patil) यांच्या नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

 

आजच्या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet Meeting)

औरंगाबाद शहराच्या ‘संभाजीनगर’ नामकरणास मान्यता (सामान्य प्रशासन विभाग)

उस्मानाबाद शहराच्या ‘धाराशीव’ नामकरणास मान्यता (सामान्य प्रशासन विभाग)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता (नगर विकास विभाग)

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार (विधी व न्याय विभाग)

राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार, हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा  (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार (कृषि विभाग)

अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ  या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार (परिवहन विभाग)

ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय (नियोजन विभाग)

निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिकसंख्या पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय (सामान्य प्रशासन विभाग)

शासन अधिसुचना 8 मार्च 2019 अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय (महसूल विभाग)

 

Web Title :- Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा