दहावीचा निकाल कधी ? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागण्यास काहीसा विलंब लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाबाबत बोलताना या महिना अखेरपर्यंत SSC चा निकाल लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.

बारावीच्या परीक्षेचे निकालही दरवर्षीच्या तुलनेत उशीरानेच लागले आहेत. 16 जुलैला महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला. बारावी प्रमाणेच दहावीचा निकालही ऑनलाईन जाहीर होईल. SSC बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील.

निकालाची नेमकी तारीख गायकवाड यांनी स्पष्ट केली नसली तरी पुढच्या काही दिवसात दहावीच्या बोर्डाचा निकाल लागेल हे निश्चित. mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर निकालासंदर्भात माहिती मिळेल. या वर्षी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे दहाविचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. त्यामुले या वर्षी दहावीचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. 17 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली आहे. केंद्र सरकारने जाहिर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीसाठी उशीर झाल्याने निकाल लांबले.