Maharashtra Crime | जनावरांची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर कार घालत तलवारीनं हल्ला, छ. संभाजीनगर येथील घटना

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime | जनावरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करणाऱ्या आणि त्यानंतर त्यांची कारमध्ये कोंबून तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मात्र, कारवाई दरम्यान आरोपींनी पोलिसाच्या अंगावर कार घलण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. परंतु पोलिसांनी प्रसंगावधान ओळखून वार चुकवल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Police) येथे सापळा कारवाई दरम्यान घडली. (Maharashtra Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी इंजेक्शन देऊन आधी जनावरांना बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांची कारमध्ये कोंबून तस्करी सुरू होती. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी सिल्लेखान्यात जनावरे विक्रीसाठी येण्यापूर्वी पथकाने आरोपींना आडवले. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी हल्ला केला. (Maharashtra Crime)

आरोपींनी पोलिसांच्या अंगावर कार घालत तलवारीने वार केला. परंतु वार चुकवल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी पोलिसांनी जहीर हसरउल्लाह खान, सुलतान मोहम्मद इकबाल पटेल आणि अबू साद अवार कुरेशी यांना अटक केली आहे. तर आफेर कुरेशी हा तलवार घेऊन पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नोकरीच्या अमिषाने कर्वेनगर येथील तरुणीची 4 लाखांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने 20 लाखांची फसवणूक, वाडगाव शेरीमधील घटना

गायक सिद्धू मुसेवाला कांडमधील शार्प शूटर संतोष जाधवच्या नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणीची धमकी

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, तीन महिलांची सुटका

परस्पर इनोव्हा कार विकून फसवणूक, कात्रजमधील एजंटवर गुन्हा दाखल

पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने पुण्यातील तरुणीची 11 लाखांची फसवणूक