जिम ट्रेनरनं वडिलांच्या मानेला दातांनी चावलं, त्यानंतर ‘गुप्तांग’ कापून केली ‘हत्या’, बोलत होता हिंदी सिनेम्यातील ‘संवाद’

नागपूर, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यात एका 25 वर्षीय मुलाने रागाने वडिलांच्या मानेला जोरदार चावले आणि नंतर त्यांचे गुप्तांग कापून ठार मारले. शनिवारी रात्री हुडकेश्वर भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. विक्रांत पिल्लेवर असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी सांगितले की आरोपी इतका हिंस्र वर्तन करीत होता की त्याला पकडण्यासाठी पोलिसांना खूप कष्ट करावे लागले. विक्रांतविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्याने सांगितले, विक्रांत कोणत्याही घटनेविना संतापला आणि आपले वडील विजय यांच्या मानेला दातांनी चावा घेतला असे कुटुंबियांनी सांगितले. त्याने इतक्या जोरात चावले की गळ्यामधून रक्तस्त्राव होऊ लागला. मग त्याने 55 वर्षांच्या वडिलांना पोर्चमध्ये नेले आणि तिथे त्यांचे गुप्तांग कापले, ज्यामुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजकमल वाघमारे म्हणाले, व्यवसायाने जिम ट्रेनर असलेला विक्रांत घटनेदरम्यान हिंदी चित्रपटाचे संवाद बोलत होता आणि विचित्र पद्धतीने वागत होता. जेव्हा आई आणि बहिणीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्या लोकांना धमकावण्यास सुरुवात केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना त्याला पकडण्यास आणि बांधून ठेवण्यास किमान पाच पोलिसांची मदत घ्यावी लागली. बरीच मेहनत घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.