‘जो श्रीरामाचा नाही तो माझ्या कामाचा नाही’, असं म्हणत शिवसेनेच्या नेत्याचा ‘राजीनामा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली हात मिळवणी काही शिवसैनिकांना रुचलेली दिसत नाही. शिवसेनेच्या युवा सेनेच्या नेत्यांपैकी एक असलेल्या रमेश सोळंकी यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सोळंकी यांनी शिवसेनेवर नाराज होऊन एका नंतर एक ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मी शिवसेनेच्या युवा सेना पदावरून राजीनामा देत आहे आणि आदित्य ठाकरेंचे आभार मानत आहे की त्यांनी मला हिंदुस्थानच्या सेवेसाठी संधी दिली.

रमेश सोळंकी यांनी एक अजून ट्विट केले आहे त्यात ते म्हणतात, गेल्या काही दिवसांमध्ये लोक मला माझ्या पक्षाबाबत विचारत आहेत. मी त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की, जो जय श्री रामचा नाही (काँग्रेस) तो माझ्या कामाचा नाही. त्यांनी सांगितले की, 1992 मध्ये ते 12 वर्षांचे असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खूप प्रभावित झाले होते आणि 1998 मध्ये शिवसेनेसोबत जोडले गेलेले होते. यावेळी हिंदुत्वसाठी अनेक पदावर काम केल्याचेही त्यांनी सांगितले.

सोळंकी पुढे म्हणाले, ‘यावेळी त्यांनी कोणतेही पद किंवा तिकिट मागितले नाही. महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याबद्दल आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून निवडल्याबद्दल अनेक अभिनंदन. पण माझा आत्मा मला कॉंग्रेसबरोबर काम करण्याची परवानगी देत नाही. मी अर्ध्या मनाने काम करू शकत नाही. ही माझी पोस्ट, माझ्या पार्टी आणि सहकाऱ्यांसाठी योग्य ठरणार नाही. ते म्हणाले, ‘म्हणूनच मी अत्यंत जड मनाने आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेतला आहे.’

“जब जहाज डूबता है तो सबसे पहले चूहे कूदकर भागते हैं” या हिंदीतील उदाहरणाचा दाखला देत सोळंकी यांनी हे देखील सांगितले की, मी माझा पक्ष अशा वेळेस सोडतोय ज्यावेळी पक्ष खूप उच्च ठिकाणी आहे.

Visit : Policenama.com