सावधान ! चुकूनही पाहू नका ‘या’ 10 वेबसीरिज आणि दहा ऑनलाईन सिनेमे, सरकारचा अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने अनेक जण घरात आहेत. त्यामुळे विरंगुळा म्हणून ऑनलाईन फिल्म्स, वेबसीरिज पहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे ऑनलाईन फिल्म्स, बेवसीरीज पहात असाल तर सावध रहा. अशा वेबसीरिज आणि फिल्म्स पाहणं तुम्हाला महागात पडू शकतं. कोरोना लॉकडाऊनच्या या काळात हॅकर्स आपला चांगलाच फायदा करून घेत आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या सायबर विभागाने अलर्ट जारी केला आहे. काही ऑनलाइन फिल्म्स आणि वेबसीरिज पाहणं चांगलंच महागात पडू शकतं, असं सरकारने सांगितलं आहे. ऑनलाईन फिल्म्स पाहण्याच्या नादात तुमचा प्रायव्हेट डेटा चोरीला जाऊ शकतो हॅकर्स यावर टपून बसले आहेत, अशी सूचना जारी करण्यात आली आहे. असे दहा चित्रपट आणि दहा वेबसीरिजची यादी सरकारने जारी केली आहे.

यामध्ये दिल्ली क्राईम, ब्रुकलीन नाइन-नाइन अशा वेबसीरिज तर मर्दानी, छपाक, जवानी जानेमन, बाहुबली अशा चित्रपटांचा समावेश आहे. सरकारने जारी केलेल्या वेबसीरिज आणि फिल्म्सच्या यादीमधील वेबसीरिज तुम्ही पहात असाल, चित्रपट ऑनलाइन पहात असाल किंवा डाऊनलोड करत असाल तर सावध रहा. ऑनलाइन मुव्ही पाहताना कोणतीही परवानगी देऊ नका. नाहीतर हँकर्स तुमचा पर्सनल डाटा चोरी करू शकतात, असं सायबर विभागाने सांगितलं आहे.