पुण्यात लागलेल्या ‘या’ बॅनरने सगळ्यांचं लक्षं वेधलं, सत्तास्थापनेसाठी बनणार नवं समीकरण ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काल झालेल्या पत्रकार परिषदेमधून शिवसेना व भाजपाने एकमेकांवर खोटेपणाचा आरोप करण्याचे राजकारण सुरु केल्याने आज राज्यात सत्तास्थापनेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती पाहता राज्यात महायुतीचे सरकार येईल असे काहीच चिन्ह दिसत नाही. काल झालेल्या पत्रकार परिषदेमधून राज्याच भाजपाचे सरकार येईल असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी केला मात्र, बहुमत नसतानाही सरकार कसे स्थापन करणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. आता सरकार नेमके कोणाचे येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दोन्ही पक्षांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. यामध्ये सत्तास्थापनेविषयी चर्चा झाली. सोशल मीडियावर कॉंग्रेस-राष्टवादी-शिवसेना हे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी चर्चा सुरु आहे मात्र, अशा परिस्थितीमध्ये पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटोंचे पोस्टर लावण्यात आले आहे. हा पोस्टर राष्ट्रवादीचे अनिस सुंडके यांनी लावला आहे.

या पोस्टरचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या पोस्टरवर लिहलेल्या मजकूरकडे सर्वांचे लक्ष आहे. या बॅनरवर लिहले आहे की, ‘महाराष्ट्रातील जनतेने संघर्षातील आदेश स्विकारले आहे. बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेत धनुष्यबाणातील अचूक वेधाने जाणता नेता स्विकारावा.’ या पोस्टरने राज्यातील नव्या समीकरणाचे संकेत दिले आहे वाटतं अशी चर्चा सर्व ठिकाणी सुरु आहे पण हे सर्व प्रकरण कितपत सत्य आहे हे येणाऱ्या काळात कळेलच.

Visit : Policenama.com